Our Events
Explore the impactful events and medical initiatives we've undertaken to serve our community.
Upcoming events will be posted here shortly. Please check back again.
HPV Vaccination Camp
गर्भाशय मुखाच्या (Cervical Cancer) कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी HPV (Human Papillomavirus) लस अत्यंत प्रभावी मानली जाते. मुलींच्या आरोग्यदायी आणि सुरक्षित भविष्यासाठी बालासाहेब देवरस पॉलीक्लिनिक येथे ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी मोफत HPV लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या लसीमुळे HPV संसर्गापासून संरक्षण मिळते तसेच भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना दोन डोस देण्यात येतात. पहिला डोस शिबिराच्या दिवशी तर दुसरा डोस ६ ते १२ महिन्यांनंतर दिला जातो.
Free Dental Checkup Camp
बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर आणि CSR – Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MSETCL) यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल डिस्पेन्सरी / सेवा OPD प्रकल्पांतर्गत अंबिका नगर (अप्पर डेपो) तसेच शेळके वस्ती, सुखसागरनगर येथे मोफत दंत तपासणी व उपचार शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. दिनांक 23 मे 2026 रोजी अंबिका नगर येथे आयोजित शिबिरात 28 नागरिकांनी लाभ घेतला, तर दिनांक 25 मे 2026 रोजी शेळके वस्ती येथे आयोजित शिबिरात 48 नागरिकांची तपासणी करण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही शिबिरांमधून एकूण 76 लाभार्थ्यांनी मोफत दंत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. शिबिरांमध्ये दातांची तपासणी, मुख आरोग्याविषयी मार्गदर्शन, दातांची स्वच्छता व निगा राखण्याबाबत सल्ला, औषध वितरण तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. तज्ज्ञ दंतचिकित्सकांनी दात किडणे, हिरड्यांचे आजार, मुखस्वच्छतेचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या उपक्रमात डॉ. नितीन झोर्गे, डॉ. सुप्रिधा भंडारी (Dentist), डॉ. प्रतिक्षा कोडम (Dentist), डॉ. प्रतिक्षा नागळे तसेच बालासाहेब देवरस पॉलीक्लिनिकच्या आरोग्य सेवा पथकातील सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
Women's Heath Check Up Camp
ब्लड चेकअप कॅम्प अंतर्गत महिलांसाठीच्या आरोग्य तपासण्या: 1. CBC 2. HbA1C अंदाजे लाभार्थी संख्या: 40
Free Women’s Health Check-up Camp
बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक आणि National Medico Organization यांच्या संयुक्त विद्यमाने "मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर." या शिबिरासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर (Gynecologist) उपस्थित राहणार आहेत. 👉 शिबिरामध्ये खालील सेवा उपलब्ध असतील: • गरोदर महिलांची तपासणी • महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी व उपचार • हिमोग्लोबिन तपासणी • स्तन कर्करोग तपासणी • रक्तातील साखर तपासणी • BMI व BP तपासणी • HPV (गर्भाशय मुख कर्करोग) जनजागृती 👉 आपल्या परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: कुमारी निकिता कचरे 8329289176 डॉ. नितीन झोडगे – 9423330111
Dhanvantari Pujan
Dhanvantari Pujan
Blood Donation Drive
Your donation can save lives. Join our annual blood donation drive, organized in collaboration with local blood banks.
Free Health Check-up Camp
A comprehensive health check-up camp offering free consultations, basic health screenings, and medical advice from our expert doctors at the new Rugnalay facility.
CT Scan Inauguration
Inauguration of our state-of-the-art CT Scan facility, enhancing our diagnostic capabilities to better serve the community.
Community Vaccination Drive
Successfully organized a massive COVID-19 vaccination drive, contributing to the health and safety of our community.
Covid Seva Kary
जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले असताना, प्रत्येक नागरिक आपापल्या परीने या अदृश्य शत्रूविरुद्ध लढा देत होता. या अभूतपूर्व संकटाच्या काळात बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, पुणे वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी आणि मानसिक आधारासाठी जे सेवाकार्य केले गेले, ते खऱ्या अर्थाने सेवाधर्माचे जिवंत उदाहरण ठरले. 🛡️ संकटाची जाणीव – प्रबोधन आणि समुपदेशन कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, नागरिकांमध्ये भीती, संभ्रम व मानसिक ताण वाढत असल्याचे लक्षात आले. यासाठी डॉक्टर, समुपदेशन तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित नागरिकांचा एक विशेष गट तयार करून प्रबोधन, शंका-निरसन आणि मानसिक संतुलन राखण्यासाठी वैयक्तिक संपर्क सेवा सुरू करण्यात आली. अनेक नागरिकांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून या सेवांचा लाभ घेतला. 🏥 सेवा वस्त्यांमध्ये थेट आरोग्यसेवा दि. २५ एप्रिल २०२० पासून, लॉकडाऊनचा कालावधी वगळता, भारतीय जैन सेवा संघाच्या सहकार्याने सेवा वस्त्यांमध्ये नियमितपणे • आरोग्य तपासणी • औषध वाटप • स्क्रीनिंग • संभाव्य कोरोना रुग्णांची ओळख व पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन हे सर्व कार्य सातत्याने राबविण्यात आले. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्या रुग्णांसाठीही लॉकडाऊनच्या अंशतः कालावधीत आवश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. 🌿 आयुर्वेद व होमिओपॅथीचा प्रतिबंधात्मक आधार • आयुर्वेद विभागामार्फत प्रतिबंधात्मक काढा व आवश्यक औषधांची नियमित उपलब्धता करण्यात आली. • होमिओपॅथी विभागामार्फत सुमारे ४,००० नागरिकांना Arsenicum Album या औषधाचे वितरण करण्यात आले. • दररोज सुमारे ५0० नागरिकांना मोफत काढा वितरण सेंटरमध्ये केले जात होते. 😷 संरक्षण साहित्य व मदतकार्य • सुमारे १,००० नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. • पॉलीक्लिनिकच्या आसपास जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या सुमारे 100 डॉक्टरांना PPE किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या, जेणेकरून ते सुरक्षितपणे रुग्णसेवा देऊ शकतील. 🚑 घरपोच औषध सेवा – गरजूंकरिता दिलासा लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडणे कठीण असताना, औषध विभागामार्फत नजीकच्या रुग्णांसाठी घरपोच औषध सेवा सुरू ठेवण्यात आली. ही सेवा विशेषतः ज्येष्ठ नागरिक व दीर्घकालीन आजार असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. 🙏 कृतज्ञतेचा भाव कोरोना महामारीच्या अंधारात आशेचा दिवा ठरलेले हे सेवाकार्य म्हणजे मानवतेचा विजय आहे. बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिकने केवळ उपचारच दिले नाहीत, तर धैर्य, विश्वास आणि आधार दिला—आणि म्हणूनच हे कार्य समाजाच्या स्मरणात कायम राहील.